इम्तियाज जलील यांना सॉफ्ट कॉर्नर... तर हर्षवर्धन जाधव यांच्या लोकप्रियतेला ओहोटी ! झांबड चर्चे बाहेरच !

Foto
औरंगाबाद : लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या तीन आमदारांचे राजकीय भविष्य कसे असेल यावर आता चर्चा रंगू लागली आहे. मतदारांच्या विश्वासात इम्तियाज जलील सर्वात पुढे आहेत तर हर्षवर्धन जाधव यांचे राजकारण संधीसाधू आणि विनाशक असल्याची टीका होऊ लागली आहे. आमदार सुभाष झांबड चर्चेच्या परिघात कुठेही नसल्याचे दिसते.

 लोकसभा निवडणुकीत या वेळी चौरंगी लढत होईल अशी अपेक्षा होती. मात्र तिरंगी लढत झाली. मध्य विधानसभा मतदार संघात जशी परिस्थिती होती अगदी हुबेहूब तशीच परिस्थिती लोकसभेला राहिली. आमदार जलील आणि खासदार खैरे यांच्या थेट फाईट झाली असती तर खैरे यांचा विजय निश्चित होता. मात्र अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी खैरे यांची हक्कांची मतपेढी पळवल्याने साडेचार हजार मतांनी खैरे पराभूत झाले. दुरंगी लढतीत हर्षवर्धन जाधव यांनी मिठाचा खडा टाकल्याची भावना आता व्यक्त होत आहे. जिंकायचेच नव्हते तर हरण्यासाठी म्हणून एवढा आटापिटा का ?असाही सवाल विचारला जात आहे. बरे, ज्या हिंदुत्वाच्या बळावर औरंगाबादेत राजकारण चालते त्याच हिंदुत्वाला नामोहरण करण्याचे काम जाधव यांनी केले. याचा संताप सध्या सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या जोरावर इम्तियाज जलील निवडून आलेत. त्यांना मात्र टीकेचा सामना करावा लागत नाही, हे खरेच ! कारण त्यांनी प्रभावी मुद्दे मांडून शहरवासीयांना आकर्षित केले. ग्रामीण भागातही चांगले मते मिळवत सर्व समाजाला सोबत घेऊन चालले, असे मतदानाची आकडेवारी सांगते. त्यांचे राजकारण बेरजेचे होते. खैरे बाबतही सहानुभूतीची लाट आहे. खैरे जिंकायला नको असे म्हणणारे खैरे पराभूत होताच नाराज झाले हेही तेवढेच खरे ! याचे कारण जलील यांच्या विजयात दडले आहे. खैरे  नको होते ही भावना जेवढी प्रबळ होती तेवढीच इम्तियाज जलीलही निवडून यायला नको ही लोकांची भावना होती, यात शंका नाही. बेरीज वजाबाकी च्या आकड्यात जिंकले आणि हरणे महत्वाचे ठरत असले तरी समाजात निर्माण झालेली भावना अतिशय महत्वाची ठरते. 

हर्षवर्धन ठरले खलनायक...
देशात सर्वत्र मोदी लाट असताना आणि मराठवाड्यातील भाजप-सेना युती जवळजवळ सर्वच ठिकाणी विजयी पताका फडकावत असताना औरंगाबादेत मात्र अपक्षाच्या मदतीने एमआयएम पक्षाचा उमेदवार जिंकतो याचाच संताप सर्वत्र दिसतो आहे. मतदानानंतर समोर आलेल्या आकडेवारीवरून हर्षवर्धन यांच्या कन्नड तालुक्यातच खैरे आघाडीवर आहेत. हे चित्र हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी मुळीच चांगले नाही. यापुढे त्यांचे राजकारण अडचणीत येणार आहे. जलील यांची मैत्री त्यांच्यासाठी अडचणीची ठरू लागेल, यात शंका नाही. हर्षवर्धन जाधव यांनी बेरजेचे राजकारण करायला हवे होते, असा मतप्रवाह आहे. हर्षवर्धन जिंकले असते तर हिरो ठरले असते मात्र खैरना  हरवुन हिरो ठरतील, असा त्यांचा समज असेल तर तो पूर्णतः चुकीचाच म्हणावा लागेल. ज्यांनी हर्षवर्धन जाधव यांना मतदान केले तेच आता नाराजीचे सूर आळवत आहेत. आपल्यामुळेच एमआयएमचा खासदार झाल्याची सल कायम राहील, असे अनेक मतदारांनी सांगितले तेव्हा आता यापुढे जाधवांना मतदान करताना मतदार चार वेळेस विचार करतील, असे अनेकांनी बोलून दाखवले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker